• Sat. Mar 14th, 2026

    महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंधांचे आरोप, Girish Mahajan अ‍ॅक्शन मोडवर, खडसे अडचणीत येणार?

    महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंधांचे आरोप, Girish Mahajan अ‍ॅक्शन मोडवर, खडसे अडचणीत येणार?

    Girish Mahajan Defamation Notice : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले होते, ज्यात एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा उल्लेख होता. या आरोपांमुळे संतप्त झालेल्या गिरीश महाजन यांनी खडसेंना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. यासोबतच, पत्रकार अनिल थत्ते यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांच्यावर IAS महिला अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा आरोप करत निशाणा साधला होता. खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली होती. यानंतर गिरीश महाजन यांनी आपण या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आपल्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण त्या पातळीवर जावून बोलणार नाही, असं गिरीश महाजन म्हणाले होते. यानंतर आता गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आरोपांप्रकरणी कठोर पाऊल उचललं आहे.

    गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. खडसे आणि महाजन यांनी एकेकाळी एकाच पक्षात राहून सोबत काम केलं आहे. पण आता दोन्ही नेते एकमेकांवर अतिशय टोकाची टीका-टीप्पणी करताना दिसतात. खडसे यांनी गिरीश महाजन यांचे IAS महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप कोणत्या आधारावर केला ते देखील नंतर स्पष्ट केले होते. पत्रकार अनिल थत्ते यांनी केलेल्या आरोपांवरुनच आपण संबंधित आरोप केल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे खडसेंनी अनिल थत्ते यांनाही अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे.

    गिरीश महाजन काय म्हणाले?

    दरम्यान, गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि अनिल थत्ते यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “कुणीही यावं आणि काहीही आरोप करावे हे मला मान्य नाही. अशाप्रकारच्या आरोपांमुळे जनमानसात आपली प्रतिमा मलिन होते. त्यामुले मी माझ्या मुंबईतील वकिलांच्या माध्यमातूनं संबंधितांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्यांना ही नोटीस मिळाली असेल. यापुढे मी त्यांच्याशी कोर्टातच लढणार”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी ‘एबीपी माझा’ वृत्त वाहिनीला दिली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed