या देशात पैशाची कमी नाही आहे, इमानदारीने देशाकरता काम करणारांची कमी आहे, मी संकल्प केला आहे की, दरवर्षी १० लाख कोटी रुपयांची कामं करायची, मला काही पैशांची कमी नाही, दोन लाख 80 हजार कोटी रुपये हे माझं बजेट आहे. आता तीन लाख कोटी झालं आहे, असं केंद्रीय परिवहन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते ७८ व्या वसंत व्याखानमालेमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले गडकरी?
या देशात पैशाची कमी नाही आहे, इमानदारीने देशाकरता काम करणारांची कमी आहे, मी संकल्प केला आहे की, दरवर्षी १० लाख कोटी रुपयांची कामं करायची, मला काही पैशांची कमी नाही, दोन लाख 80 हजार कोटी रुपये हे माझं बजेट आहे. आता तीन लाख कोटी झालं आहे. पण माझा प्रश्न पैशाचा नाही आहे, माझा प्रश्न एवढे पैसे खर्च का होत नाही हा माझा प्रश्न आहे. मुंबई गोवा रस्ता पूर्ण करताना खूप अडचणी आल्या, पण आता येणाऱ्या जूनपर्यंत हा रस्ता १०० टक्के पूर्ण होईल, दिल्ली -जयपूर महामार्ग देखील अडचणीचा होता, असं यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढील पंधरा दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील टोल संदर्भात एक नवीन पॉलिसी समोर येईल, अशी घोषणाही यावेळी नितीन गडकरी यांनी केली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आशियातली सगळ्यात मोठं भुयार झोजीला, तिथे आठ डिग्री तापमान आहे, ज्याचं बजेट १२ हजार कोटी होतं, मात्र आम्ही ५५०० कोटीमध्ये हा रस्ता करणार आहोत, सहा हजार रुपये वाचवले. जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढच्या दोन वर्षांच्या आत इंडियन रोड इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल हायवे हे अमेरिकेपेक्षा चांगले होतील, असा विश्वास देतो या देशात पाण्याची कमी नाही पाण्याच्या नियोजनाची कमी आहे, असंही यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.