Pune Lucknow Indigo Flight delayed by 18 hours Man going for son last rites waited
काय झालं नेमकं?
पुणे विमानतळावरून इंडिगो कंपनीचे ‘६ ई ०३३८’ हे विमान शुक्रवारी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण करणार होते. विमान कंपनीकडून ते रद्द करून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी म्हणजेच १२ एप्रिल रोजी उड्डाण करणार असल्याचे प्रवाशांना सांगितले. त्यामुळे सर्व प्रवाशी पुणे विमानतळावर रात्री १० वाजण्याच्या सुमारास आले. त्या वेळी विमान कंपनीने पुन्हा विमानाला दोन तास उशीर होणार असल्याचे सांगितले. तसा निरोप प्रवाशांना विमानतळावर पोहोचल्यानंतर मिळाला. त्यानंतर अणखी तीन तास, चार तास उशीर होईल, असे विमान कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना रात्र पुणे विमानतळावर काढावी लागली.Yavatmal Murder : पती-लेकाला सोडून विवाहिता प्रियकरासह पुण्याला; कुटुंबाने लग्नाच्या बहाण्याने दोघांना लॉजवर नेलं अन्…
विमान कंपनीचे कर्मचारी प्रवाशांना कशामुळे उशीर होत आहे आणि विमान कधी नेमके सुटेल याची व्यवस्थित माहिती देत नव्हते. अखेर विमानाने दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण केले. तब्बल १८ तास या विमानाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.Mumbai Mandwa Boat Accident : मी आणि नम्रता बोटीत होतो, लाटा उसळल्या, भगदाड पडलं, बायका-पोरं रडू लागली; NCP नेत्याने सांगितला थरार
या विमानाने पुण्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे काही कार्यकर्ते लखनौ येथे बैठकीसाठी जाणार होते. यामध्ये सूर्यकांत पाठक, विजय सागर, धनंजय गायकवाड, वीणा दीक्षित आदींचा समावेश होता. पुणे-लखनौ विमानाला उशीर झाल्याने सर्व प्रवाशी प्रचंड चिडले होते. या विमान प्रवासात दोन प्रवाशांच्या नातेवाइकांचे निधन झाल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी ते चालले होते. एक प्रवासी हा त्याच्या २२ वर्षांच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी निघाला होता. त्यांना लखनौवरून पुढे गोरखपूरला जायचे होते. काही प्रवाशांना पुढील कनेक्टिंग विमान पकडून जायचे होते, अशी माहिती प्रवाशांनी दिली.