• Sat. Apr 26th, 2025 10:15:45 AM
    Ambedkar Jayanti 2025: छत्रपती संभाजीनगरात आज पोलिसांचा चोख बंदोबस्त; १७ ड्रोनसह १५१८ कर्मचारी तैनात

    Ambedkar Jayanti 2025: या मिरवणुका शांततेत निघाव्यात, यासाठी शहर पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे. १७ ड्रोनसह तब्बल १५१८ पोलिस अंमलदार आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    police bandobast jayanti

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती साजरी केली जाणार आहे. शहराच्या विविध भागातून मिरवणुका निघत असतात. या मिरवणुका शांततेत निघाव्यात, यासाठी शहर पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे. १७ ड्रोनसह तब्बल १५१८ पोलिस अंमलदार आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

    ■ मुख्य मिरवणूक मार्ग
    क्रांतीचौक-नूतन कॉलनी-सिल्लेखाना-पैठण गेट-बाराभाई ताजीया-गुलमंडी-मच्छली खडक-सिटीचौक-जुनाबाजार-मुख्य टपाल कार्यालय-भडकल गेट

    ■ सिडको हडको मुख्य मिरवणूक
    सिडको हडकोची मुख्य मिरवणूक आंबेडकर चौकातून सुरू होईल. ती पार्श्वनाथ चौक-एम २-जिजाऊ चौक या मार्गाने निघून टिव्ही सेंटरला समाप्त होईल.
    रायगडाच्या मातीची शपथ घ्या अन् सत्य बोला…; अरविंद सावंतांची अमित शहांवर जोरदार टीका
    १७४ मिरवणुका निघणार
    शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध भागातून तब्बल १७४ मिरवणुका निघणार असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. त्यसाठीचे नियोजनही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. क्रांतीचौक येथून निघणाऱ्या मुख्य मिरवणुकीत ६१ मोठ्या मिरवणुका सहभागी होणार आहेत. तसेच सिडको हडको मुख्य मिरवणुकीत १४ मोठ्या मिरवणुका सहभागी होणार आहेत. तसेच स्थानिक मिरवणुकांमध्ये ९९ मिरवणुका निघणार आहेत. शहरातून एकूण १७४ मिरवणुका काढण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

    सामाजिक उपक्रमांचे संस्थांतर्फे आयोजन
    शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकूण १०२ पुतळे आहेत. या ठिकाणी नागरिकांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमासह प्रतिमा पुजन केले जाणार आहे. याशिवाय अनेक ठिकाणी भीमगितांचा कार्यक्रम तसेच अन्नदान कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.
    धक्कादायक! अवैध वसतिगृहात लैंगिक शोषण; खडवलीतून २९ बालकांची सुटका, संचालकासह पाच अटकेत
    पोलिसांनी केले आवाहन
    ■ मिरवणुकीत वाहनांवर विद्युत रोषणाई असते. पेट्रोल, डिझेलवर चालणारी जनरेटर असतात. त्यामुळे आगीसारख्या घडना घडू शकतात. प्रत्येक मिरवणूकवाहनावर आगविरोधी साहित्य, उपकरणे ठेवावीत.
    ■मिरवणुकीत लहान मुले किंवा महिलांना त्रास होणार नाही. यासाठी कार्यकत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कार्यकर्ते, स्वयंसेवक नेमावेत. पोलिसांना सहकार्य करावे.

    मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मिरवणुकांचे मार्ग
    ■छावणी-पेठेनगर-भावसिंगपुरा- भीमनगर नंदनवन कॉलनी-मिलकॉर्नर-औरंगपुरा-बाराभाई ताजिया
    ■ सिडको हडको-टीव्ही सेंटर-मजनु हिल-गणेश कॉलनी-जिल्हाधिकारी कार्यालय-फाजलपुरा-चेलिपुरा-शहागंज-सिटीचौक
    ■मुकुंदवाडी-जळगाव टी पॉइंट सेव्हन हिल-मोंढा नाका-क्रांतीचौक
    ■एमआयडीसी सिडको-ब्रीजवाडी (महाराष्ट्र डिस्ट्रलरीज)-धूत हॉस्पिटल-जालना रोड-जळगाव टी पॉइंट सेव्हन हिल-मोंढा नाका-क्रांतीचौक
    ■जिन्सी-बायजीपुरा चौक-नवाबपुरा-संस्थान गणपती मंदिर-शहागंज-सिटीचौक
    ■ उस्मानपुरा-उस्मानपुरा चौक-गुरुद्वारा-गोपाळ टी पॉइंट-क्रांतीचौक
    ■बेगमपुरा-टाउन हॉल-महापालिका कार्यालय बुद्धीलेन-सिटीचौक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed