Sandipan Bhumre slams Chandrakant Khaire : “या खैरेंना काय महत्त्व द्यायचं? कोण खैरे? खैरेला कोणी विचारत नाही. जनतेने तुम्हाला फार डोक्यावर घेतलं. खैरेंनी आता नातू सांभाळावं, घरी राहावं, सुखानं बसावं. जरा आता घरी बसून लोकांचा आनंद बघावा”, अशी खोचक टीका संदीपान भुमरे यांनी केली आहे.
‘खैरेंना कोणी विचारत नाही’
“चंद्रकांत खैरे यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हे खैरेंना कोणी विचारत नाही. ते स्वत: म्हणतात की, माझं कोणी ऐकत नाही. मला कुणी विचारत नाही. या खैरेंना काय महत्त्व द्यायचं? कोण खैरे? खैरेला कोणी विचारत नाही. जनतेने तुम्हाला फार डोक्यावर घेतलं. खैरेंनी आता नातू सांभाळावं, घरी राहावं, सुखानं बसावं. जरा आता घरी बसून लोकांचा आनंद बघावा”, अशी खोचक टीका संदीपान भुमरे यांनी केली आहे.
भुमरेंचा अंबादास दानवेंवरही निशाणा
“छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभा, सगळे आमदार गेले, आता महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका जाणार, अंबादासचं काय? अंबादासच काहीच नाही. तुम्हाला फक्त कागदोपत्री अंबादास दिसतोय. अंबादासचं प्रत्यक्षपणे ग्राउंड लेव्हलवर काही नाही. अहो, जिल्ह्याची वाट खैरे आणि अंबादास यांनीच लावली. सगळ्या कार्यकर्त्यांची वाट या दोघांनीच लावली. आता हे दोघच भांडत आहेत. यांच्याकडे कुणीच नाही. हे दोघेच राहणार आहेत आणि वरही दोघच बाल-लेक राहणार आहेत. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच राहतील”, अशीदेखील टीका भुमरे यांनी केली.
“तुम्ही रोज पाहा, शिवसेनेकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे रोज पक्षप्रवेशाचा ओघ चालू आहे. अहो, मला तर इतके फोन येत आहेत की, आम्हाला वेळ घेऊन द्या. आम्हाला प्रवेश करायचा आहे. शहर, जिल्ह्यातून फोन येत आहेत. तुम्हाला महापालिकाच्या निवडणुका येतील तेव्हा दिसेल”, असा दावा संदीपान भुमरे यांनी केला.