Farmer Success Story : वडिलोपार्जित दुग्ध व्यवसायापासून व तीन एकर जमिनीवरून ९० एकरपर्यंत शेती वाढवली. केवळ दूग्ध व्यवसायातून शेतीला जोडधंदा म्हणून यशाची गवसणी घातली आहे. म्हणतात ना “कष्टाचे फळ हे त्या व्यक्तीलाच गोड लागते, ज्याने कष्ट हे हातावर फोड येईपर्यंत घेतले आहेत.” अशाच एका प्रगतशील शेतकऱ्याची कहाणी जाणून घेऊयात.
हे आहेत हिंगोलीच्या बेलवाडी येथील शेतकरी रामेश्वर किसनराव मांडगे यांनी १९७२च्या काळात वडिलांनी एक म्हैस घेऊन दिली होती. तेव्हापासून हा दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून नियोजनबद्धपणे सुरुवात केली.
पाण्याचे दुर्भिक्ष असताना देखील पाण्यासाठी मोठे परिश्रम घेत एका एका थेंबापासून पाणी जोपासतं त्याचं उत्तम नियोजन मांडगेंनी केलं आहे. आतापर्यंत पाण्यासाठी १२० बोअरवेल, ८ शेततळी, तीन विहिरी नदीवरून पाईपलाईन असा मोठा पल्ला त्यांनी पाण्यासाठी गाठला आहे. यावर्षी उन्हाच्या तडाख्यामुळे पाणीपातळी कमी झाली मात्र याचा कुठलाही परिणाम आपल्या दुग्ध व्यवसायावर होऊ नये म्हणून त्यांनी आधीच आपल्या दुभत्या म्हशींकरीता स्विमिंग पूलची उभारणी केली आहे.
स्विमिंग पूल उभारताना नांदेड येथील गुरुगोविंद सिंग ट्रस्टच्या माध्यमातून तेथील स्विमिंग पूल बघून त्याचं अनुकरण करून आपल्याही शेतात याच पद्धतीचा आपल्या जनावरांसाठी उभारायचा हा उद्देश त्यांनी ठेवला. त्याठिकाणी वारंवार जाऊन तेथील माहिती घेतली व आपल्या शेतात कसा सेट करता येईल त्याचे प्रयत्न केले व स्विमिंग पूल बनवला. आता यामध्ये रिसायकलिंग करून पाण्याचा वापर केला जात आहे. जनावरांसाठी फॉगर्स लावणे म्हैशीची स्वच्छता त्या पाण्यापासून केली जाते.
जनावरांसाठी थंड पाणी व त्या पाण्यापासून शेतातील पिकांना सेंद्रिय स्लरीचे पाणी पिकांना मिळत आहे. उन्हाचे दिवस असल्याने दुपारच्या प्रहारी या म्हशींना या स्विमिंग पूलात सोडलं जातं. तब्बल तीन तास पाण्यामध्ये पोहण्याचा म्हशी आनंद घेतात व जनावरांच्या मलमुत्र विष्टा वेस्टेज झालेले पाण्याचा शेतीसाठी वापर केला जातो. त्यापासून उत्तम प्रतीचा हिरवा चारा या जनावरांना मिळत आहे. उत्तम प्रतीचा जनावरांना चारा स्वच्छ पाणी यामुळे दुधात देखील चांगली भर पडते यासाठी परिवारातील सर्व सदस्य व नोकर देखील जनावरांच्या देखभालीसाठी आहेत. प्रत्येक काम नियोजिनबद्धपमे केलं जात आहे.
जनावरांचे संगोपन, जनावरांच्या चाऱ्याचं संगोपन त्याचबरोबर प्रत्येक जनावरांची काळजी घेणे हे आमच्यासाठी तारेवरील कसरत आहे त्यापासून आम्हाला आनंद मिळतोय असं देखील यावेळी मांडगे यांनी सांगितलंय. हिंगोली सारख्या ठिकाणी त्यांनी या व्यवसायातून उभारी घेत दुधापासून बनणारे प्रॉडक्ट्स देखील विक्री केली जाते. यात दूध विक्री, खवा, पनीर ,मठ्ठा विक्री केली जातेय. म्हशींमध्ये मुरा आणि जाफरा या जातीच्या म्हैशी व गायीमध्ये गीर गायी जास्त प्रमाणात पाळल्या जातात. इतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत कुठलाही एक जोडधंदा करावा असं रामेश्वर मांडगे सांगतात.