आमदार संतोष बांगर यांनी एमजीएम रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, एका डेंगू झालेल्या मुलीला दहा दिवस ठेवल्याबद्दल तिच्याकडून जास्त बिल आकारले. बांगर यांनी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर बिल कमी करण्यात आले. यासोबतच त्यांनी अजून काही आरोप देखील केली.
आमदार संतोष बांगर यांनी एमजीएम रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष बांगर म्हणाले की, मला आदिती सरकटेच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, मागील दहा दिवसांपासून माझी मुलगी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल आहे आणि आज तिला सोडणार आहेत. माझ्या मुलीला डेंगू झाला होता, माझी मुलगी दहा दिवसांपासून तिथे ऍडमिट आहे. तीन लाख पाच हजार रुपये मेडिकलचे बिल दिले आहे.
भिसे कुटुंबियांची पोलिसात धाव, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर मोठा आरोपएक लाख ८५ हजार रुपये हॉस्पिटलचे बिल पेड केले अजून एक लाख 27 हजार रुपये बाकी आहेत त्यांनी सांगितले की, 21 हजार रुपये आम्ही डिस्काउंट देतो बाकीचे पैसे भरल्याशिवाय तुमच्या रुग्णाला सुट्टी करणार नाहीत. डॉक्टरांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तिथे कोणीही उत्तर देत नाहीये. या ठिकाणी लुट होते आम्ही जर बोलले तर आम्हाला नोकरीवरून घरी पाठवतात, असे तेथील काहींनी सांगितले. बांगर म्हणाले, त्यानंतर डॉक्टरचा नंबर घेऊन मी डॉक्टरांना बोललो.
डॉक्टर साहेब हे किती योग्य आहे तीन लाख पाच हजाराचा तुम्ही मेडिकलचे बिल घेता आणि दोन लाख ८५ हजार रुपये तुमच्या हॉस्पिटलचे बिल तुम्ही केले, त्या मुलीला काय अमृत पाजले का हो?. मला वाटतंय खाटीक हे फक्त म्हणायलाच खाटीक आहेत. परंतु खरे खाटीक एमजीएम रुग्णालयाची टीम आहे. माझी तक्रार सुद्धा गेलेली आहे. आरोग्य खात्यातील ओएसडीला बोललोय माझ्या पूर्ण व्यथा मी मांडल्या आहेत. त्यांना बोलल्यानंतरच ते बिल कमी झाले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री यांना देखील मी माझ्या व्यथा सांगितल्या असे आमदार संतोष बांगर यांनी म्हटले.

