सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: एसटी बसने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ अखेर चव्हाट्यावर आला आहे. राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिल्लोड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस डेपोतील उपहारगृहावर धडक कारवाई केली. या धाडीदरम्यान कॅन्टीनमध्ये कमालीची अस्वच्छता आणि नियमांची पायमल्ली आढळल्याने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एफएसएसएआय परवाना जागेवरच निलंबित करून हे कॅन्टीन तात्काळ सील केले आहे.
कॅन्टीन की अस्वच्छतेचे केंद्र?
– प्रशासकीय पथकाने सिल्लोड येथील बस डेपोच्या उपहारगृहावर धाड टाकली असता कॅन्टीनच्या कानाकोपऱ्यात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले.
– फरशीवर कचरा अन् चिखल: उपहारगृहाची फरशी अतिशय घाणेरडी झाली असून त्यावर माती आणि खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांचा सडा पडला होता.
– भांडी धुण्याच्या जागी चिखलाचे डाग: खरकटी भांडी धुण्याच्या जागेवर सांडपाणी साचून चिखल आणि निसरडे डाग पडले होते. अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांसाठी वापरली जाणारी भांडी धुतली जात होती.
– भिंती काळ्या अन् पापुद्रे निघालेले: स्वयंपाकघर व कॅन्टीनच्या भिंतींचा रंग उडालेला असून त्या काळ्या पडल्या होत्या. खिडक्यांना लोखंडी जाळी नसल्याने उंदीर आणि कीटकांचा थेट वावर होत होता.पाणी तपासणी अहवाल अन् परवाना गायबतपासणीदरम्यान कॅन्टीन चालकाला अन्न सुरक्षेचे मूलभूत नियमही पाळता आले नाहीत. आस्थापनेत कुठलाही परवाना फलक लावलेला नव्हता. प्रवाशांना पाजल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेचा पाणी तपासणी अहवाल उपलब्ध नव्हता. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नव्हती आणि कचराकुंड्या झाकणांशिवाय उघड्या ठेवण्यात आल्या होत्या. कामगारांची वैद्यकीय चाचणी नाही; खरेदी नोंदही अपूर्णअन्न शिजवणाऱ्या आणि वाढणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. कामगारांकडे हातमोजे किंवा ॲप्रन नव्हते. याशिवाय चिप्स, नमकीन आणि इतर साहित्याच्या खरेदीचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नव्हता. मयूर’ ब्रँडच्या चणाडाळीचा साठा आणि त्याचे खरेदी बिल तपासणीवेळी गायब असल्याचे आढळले. कॅन्टीनमधील निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एफडीएने कठोर पाऊल उचलत कॅन्टीनचा परवाना निलंबित केला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा