Authored byसूरज सकुंडे | Contributed byजितेंद्र खापरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम9 Apr 2025, 9:06 am
लंडनमध्ये भव्यदिव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारण्यात येणार आहे.पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराप्रमाणेच हे मंदिर असणार आहे. यानिमित्तानं १५ एप्रिल २०२५ रोजी पंढरपूरहून लंडनकडे जाणारी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी मार्गस्थ होणार आहे. पंढरपूरच्या वारीचा जिव्हाळा, भक्ती आणि एकोप्याचा अनुभव संपूर्ण जगाला देणे हा आहे, हा यामागचा उद्देश आहे. ७० दिवस, २२ देश अन् १८००० किमी प्रवास विठुरायाची दिंडी करणार आहे.