Disha Salian Death Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, वकिलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाकडून अवमान नोटीस
दिशा सालियनच्या मृत्यूची Disha Salian Death Case सीबीआय चौकशी व्हावी, याकरिता याचिका करणारे तिचे वडील सतीश सालियन यांचे वकील अॅड. नीलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेत न्यायमूर्तींवर गंभीर आरोप केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने Mumbai High Court मंगळवारी त्यांच्याविरोधात स्वत:हून न्यायालय अवमानाची कायदेशीर कार्यवाही सुरू केली.‘ओझा यांची विधाने ही प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान करणारी आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालय अवमान कायदा (बॉम्बे हायकोर्ट) नियम, १९९४च्या नियम ८ व नियम (१) अन्वये नोटीस बजावण्याचे निर्देश रजिस्ट्रीला देत आहोत’, असे मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाने आदेशात स्पष्ट केले.