नागपूर शहरातील ताजबाग परिसरालगत असलेल्या एका कूलर कारखान्यात…सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ आकाशात झेपावताच परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत तत्काळ फायर ब्रिगेडला माहिती दिली. नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चार गाड्या काही मिनिटांतच…घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.फायर ब्रिगेडचे जवान सुमारे दोन तास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत होते.