MNS Chief Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
या दरम्यान काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनी मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी अशा कर्मचाऱ्यांना चोपही दिला. या घटनेमुळे अमराठी बँक कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या आग्रहानंतर संबंधित आंदोलन मागे घेण्याचं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. असं असलं तरी राज ठाकरे यांच्याविरोधात एका उत्तर भारतीय संघटनेच्या प्रमुखाने थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ने याबाबत वृत्त दिलं आहे.Tanisha Bhise Case : ‘धमक्यांचे फोन, भीती वाटते, रात्री झोपू शकत नाही’, डॉ. घैसास राजीनाम्यात काय-काय म्हणाले?
राज ठाकरेंविरोधात कुणी केली याचिका दाखल?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. मनसे कार्यकर्ते हिंदी भाषिकांवर हल्ला करत असल्याचा आरोप सुनील शुक्ला यांनी याचिकेत केला आहे. राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत, असादेखील आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच मनसेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या याचिकेनंतर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.Tanisha Bhise मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी बातमी, डॉ. घैसास यांचा राजीनामा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अमराठींकडून मराठी भाषिकांवर हल्ला होण्याच्या घटना देखील घडल्या. तसेच एका टेलिफोन कंपनीच्या गॅलरीत गेल्यावर तिथल्या महिला कर्मचाऱ्याला ग्राहकाने मराठीत बोलण्याचा आग्रह केला तेव्हा तिने मराठी येत नाही, असं म्हटलं. अशा बऱ्याच घटना घडल्या. या घटनांवरुन मनसे आक्रमक झाली. मनसेकडून नेहमी मराठी भाषेसाठी विविध आंदोलने करण्यात आलेली आहेत.