Pratik Dhumal Success Story : प्रतीक २०२१ मध्ये आपली नोकरी सोडून पुण्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात आपल्या गावी परतला. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात त्यांचं चार एकर क्षेत्र आहे. प्रतिकने तेथे वैदिक शेतीला सुरुवात केली. आज तो यशस्वी शेतकरी झाला आहे.
प्रतीक २०२१ मध्ये आपली नोकरी सोडून पुण्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात आपल्या गावी परतला. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात त्यांचं चार एकर क्षेत्र आहे. प्रतिकने तेथे वैदिक शेतीला सुरुवात केली. त्यांनी रासायनिक खतांपासून पूर्णतः मुक्त अशी शेती पद्धत स्वीकारली आणि सुरुवातीला काही अडचणींचा सामना केला. मात्र, चिकाटी आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर यामुळे त्यांना उत्तम यश मिळू लागले.
प्रतीकने गेल्या चार वर्षांत आपल्या कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांच्या मदतीने चार एकर शेतीत वैदिक पद्धतीने विविध उत्पादन घेऊन वर्षाकाठी 4 ते 5 लाखांचे उत्पन्न मिळवले. आता त्याने टरबुज आणि खरबूज या फळ पिकाचं उत्पादन घेतलं असून थेट बाजारात विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.Tanisha Bhise Case : ‘धमक्यांचे फोन, भीती वाटते, रात्री झोपू शकत नाही’, डॉ. घैसास राजीनाम्यात काय-काय म्हणाले?
प्रतीक यांची ही कहाणी तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी नवी दिशा दाखवते. हल्ली तरुणांमध्ये नोकरीची क्रेझ आहे. अनेक जण शहराकडे वळताना दिसत आहे. स्मार्ट लाईफस्टाईलच्या चक्करमध्ये स्वतःची शेती उद्ध्वस्त होत असल्याचे अनेक उदाहरण आहे. मात्र प्रतीक याला अपवाद ठरत त्याने नोकरी करण्याचा निर्णय बदलून आपल्या स्वतःच्या हक्काच्या शेतीकडे वळला. तरुण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी शेती देखील करीत आहे आणि त्यातून वर्षकाठी लाखोंचा उत्पन्न कमवत आहे. प्रतीकने आपल्या शेतीत यशस्वी प्रयोग करून इतर तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला हे मात्र नक्की.Prashant Koratkar : असीम सरोदेंच्या दाव्यावर कोरोटकरच्या वकिलांचा आक्षेप, वकिलांमध्ये खडाजंगी, वाचा A टू Z युक्तिवाद
वैदिक शेती म्हणजे काय?
हल्ली पिकांवर रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून त्याचे दुष्परिणाम नागरिकांना जाणवत आहे. त्यामुळे अनेक जण जैविक किंवा सेंद्रीय शेतीकडे वळत असून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अनेक शेतकरी आता वैदिक शेती करीत आहे. वैदिक शेतीमध्ये वैदिक खतांचा वापर होतो. वैदिक खतामध्ये गोमूत्र, जनावरांचं मलमूत्र, सोबत तंबाकू डस्ट, निंबोळी पेंढ, कोंबडी खत, बोनमिळा, तांदळ तूस, प्रेसमड आदींसह काही वनस्पतींच्या आधारे खत तयार करून याचा शेतीसाठी वापर केला जातो.