Ramdas Tadas News : माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. रामदास तडस यांनी सोवळं न नेसल्यामुळे पुजाऱ्यांनी त्यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“मी दरवर्षी राम नवमीच्या दिवशी दर्शनाला जातो. मी 40 वर्षांपासून अशाप्रकारे राम नवमीच्या दिवशी राम मंदिरात दर्शनासाठी जातो. मी राम मंदिराच्या गर्भगृहात जावून रामलल्लांची पूजा करतो. यावेळी माझी पत्नी, कार्यकर्ते सोबत असतात. राम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी दिवसभराच्या कार्यक्रमाला जात असतो. पण यावर्षी आम्ही राम मंदिरात गेल्यानंतर पुजाऱ्याने अडवलं. संबंधित पुजारी हाच मंदिराचा ट्रस्टी आहे. तो पुण्याला राहतो. फक्त राम नवनीच्या दिवशी तिथे येतो”, असं रामदास तडस यांनी सांगितलं.Girish Mahajan : महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप, खडसेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
“संबंधित पुजाऱ्यांनी मला राम मंदिराच्या गर्भगृहात दर्शनासाठी जाण्यास मनाई केली. तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाहीत. तुम्ही दुरूनच दर्शन घ्या. मी म्हटलं, मी 40 वर्षांपासून दर्शनाला येतोय. हे काही तुमचं बरोबर नाही. आम्हाला रामलल्लांची आस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती करुन दिली आणि तुम्ही मला दर्शन घेण्यापासून रोखत आहात”, असंही रामदास तडस यांनी सांगितलं.
“तुम्ही सोवळं घातलं नाही त्यामुळे तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाहीत, असं पुजारी म्हणाले. यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. कार्यकर्ते आणि पुजाऱ्यामध्ये संघर्ष होण्याची वेळ आली. पण मी विचार केला, आज राम नवमीचा दिवस आहे. आपल्यासाठी संघर्ष बरोबर नाही. संघर्ष करु नका, अशी कार्यकर्त्यांना समज दिली. आमच्या आमदारांनी देखील समज दिली”, अशी माहिती रामदास तडस यांनी दिली.Manikrao Kokate : अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे मागितली माफी, पाहा नेमकं काय म्हणाले?
“आमदारांनी त्या देवस्थानचं ऑडीट काढण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे त्या देवस्थानची 200 एकर जमीन असूनसुद्धा वर्गणी करुन सर्व कार्यक्रम करतो. त्यांची मक्तेदारी तिथे आहे. ते अशाप्रकारे लोकांचा अवमान करतात. त्यांची अशाप्रकारची वागणूक बरोबर नाही. माझ्यासोबत पुजारी वागले ते पाहून मी आश्चर्यचकीत झालोय. जनतेने या प्रकरणी तक्रार केली आहे”, असंही रामदास तडस यांनी सांगितलं.