महाड शहरातील पंचशील नगर नवेनगर परिसरात मनोरुग्ण इसम महिलांचे कपडे चोरत असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणात आरोपी निलेश इल्या बाळा एनकरला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून आवारात वाळत टाकलेले महिलांचे कपडे रात्रीच्या वेळी अचानक गायब होत होते. हे कपडे अचानक गायब कसे होतात? असा प्रश्न प्रदीप अनंत सोंडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना पडला होता. या घटनेचा याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांनी सीसीटीव्ही फुटेज बसवले आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झाला.
महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 305 (b) कलमाप्रमाणे किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. मात्र पोलीस ठाण्यात किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पाटील या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास करीत आहेत.Ajit Pawar : ‘कुत्र्यासारखं मारलं, वरुन दादा पोटात घ्या म्हणता, शरम कशी वाटत नाही’, अजित पवार चांगलेच भडकले
निलेश इल्या बाळा एनकर असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो महाड शहरातील पंचशील नगर नवेनगर येथे राहणारा आहे. त्याला काही मानसिक त्रास असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्रीच्या वेळी महिलांचे कपडे चोरायचा फेकून द्यायचा. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही वैद्यकीय तपासणी करणार आहोत, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.