नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी (४ एप्रिल) दुर्दैवी घटना घडली. शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर ८० फूट खोल विहरीत कोसळला. यात सात महिला मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन महिला आणि एक पुरुष बचावले. प्रत्यक्षदर्शी असलेल्या पार्वती भूरड या महिलेने घटनेचा थरार सांगितला आहे.