Minister Girish Mahajan Marathi News : महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा दावा करण्यात आला असून त्यामध्ये गृहमंत्री अमित शहांचेही नाव घेण्यात आले आहे. कोणी केलेत आरोप काय म्हटलंय जाणून घ्या.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
“गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ गिरीश महाजन यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहे. त्या महिलेचे नाव देखील मला माहित आहे मात्र ते नाव सांगणे उचित होणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होते.”
“अमित शहा यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले की तुझे एका महिला आयएस अधिकारासोबत संबंध आहे परंतु महाजन यांनी त्यांना सांगितले की नाही माझे कामानिमित्त बरेचसे अधिकाऱ्यांचे बोलले सुरू असते पण शहाणी त्यांना सांगितले की तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेले आहेत तुझे एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध सीडीआर खर बोलतो से काही प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले”, असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
मला वाटते की खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शहांना भेटणार आहे आणि अमित शहा आणि माझी भेट होतच राहते त्यावेळी मी त्यांना विचारणार आहे की, हे खाली जे चाललं आहे ते काय आहे, असं खडसे म्हणाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा टॉप खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आलेला बघायला मिळत आहे.