वैद्यकीय हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाल्याचा आरोप दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर करण्यात आला.यानंतर दीनानाथ रुग्णालयाबाहेर राजकीय पक्षांनी आंदोलनं करत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं.प्रशासनाने चौकशी समिती स्थापन करत अहवालही सादर केला. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.यापुढे इमर्जन्सी रुग्णाकडून कुठलीही अनामत रक्कम जमा करुन घेतली जाणार नाही, असा निर्णय डॉ. केळकर यांनी पत्राद्वारे जाहीर केलं.