Mumbai Crime: डासांचे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये भरून नोंदणी करावी लागेल, असे या कथित कर्मचाऱ्याने सांगितले.
खार पश्चिम येथील एका सोसायटीमध्ये ८७ वर्षीय महिला डॉक्टर वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोसायटीमध्ये डासांनी प्रचंड उच्छाद मांडला होता. सोसायटीमध्ये फवारणी तसेच पेस्ट कंट्रोल करण्याचे ठरविण्यात आले. खार पश्चिम येथील स्थानिक पालिका कार्यालयाचा संपर्क क्रमांक कुणाकडेच नव्हता. सूनबाई जेवण मस्तय, पण झोप का येतेय! सासरचे डाराडूर; लग्नाच्या चारच दिवसात नाशिकची वधू दागिन्यांसह पसार
डॉक्टरने गुगल सर्च इंजिनवर जाऊन क्रमांक शोधला. त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. यावर संपर्क केला असता समोरील व्यक्तीने पालिका कर्मचारी बोलत असल्याचे सांगितले. डासांचे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये भरून नोंदणी करावी लागेल, असे या कथित कर्मचाऱ्याने सांगितले. सहाशे खोकी माझ्याकडेच होती, भाजपच्या वसुलीबाज पदाधिकाऱ्याची ‘बडी बडी बातें’, आता तुरुंगाची ‘हवा खातें’
पालिकेतर्फे फवारणी, पेस्ट कंट्रोल ही सेवा मोफत दिली जात आहे, मात्र नोंदणीसाठी पैसे भरावे लागतील असेही हा कर्मचारी म्हणाला. त्यावर मला ऑनलाइन पैसे पाठवता येत नसल्याचे डॉक्टरने सांगताच समोरील व्यक्तीने त्यांच्या बँक खात्याचा तपशील घेतला. बराच उशीर डॉक्टरने फोनवर व्यग्र ठेवल्यानंतर कर्मचाऱ्याने फोन ठेवला. चहाच्या आडून तिकीट घोटाळा; चहावाल्याकडून रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर
त्यावेळी एकापाठोपाठ एक संदेश त्यांच्या मोबाइलवर आले. अडीच लाख रुपये वळते करण्यात आल्याचे हे संदेश होते. दुसऱ्या दिवशी डॉक्टरने बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यामधून १६ लाख १४ हजार काढल्याचे दिसले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.