Gunaratna Sadavarte Audio Clip Viral : गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेनंतर मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी त्यांना फोन केला. या दोघांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये योगेश खैरे आणि सदावर्ते यांच्यात जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीची आग्रही भूमिका घेतल्यानंतर सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही चेक करा. प्रत्येक अस्थापनेत ही बाब तपासून पाहा, असे आदेश या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर वकील सदावर्ते यांनी राज ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नसल्याची टीका केली होती. यानंतर आता सदावर्ते आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात मोठा वाद पाहायला मिळत आहे.Tanisha Bhise Death Case : पैशांच्या डिपॉझिटसाठी उपचार नाकारणाऱ्या सर्व हॉस्पिटल्सवर कारवाई होणार? आरोग्यमंत्र्यांकडून महत्त्वाची माहिती
“राज ठाकरे काय कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांची टोळकी बँका तसेच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धुडगूस घालतात. ती थांबायला हवी. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि सबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात तक्रार अर्ज देणार आहे”, अशी भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेनंतर मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी त्यांना फोन केला. या दोघांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये योगेश खैरे आणि सदावर्ते यांच्यात जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे.Deenanath Mangeshkar रुग्णालयावर महाराष्ट्र सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, दोषी आढळल्यास…
सदावर्ते फोनवर काय बोलतात?
“मी योग्य भूमिका मांडतोय. ती संविधानिक भूमिका आहे. तुमच्या राज ठाकरेंना उत्तर द्यायला सांगा. तुम्ही कशाला फोन करता, त्या राज ठाकरेंना करना बाबा. तू एखाद्या टॅक्सीवाल्याला हात लावून दाखव तुझ्या राज ठाकरेला कायदा काय असतो ते सांगतो. ठेव फोन”, असं गुणरत्न सदावर्ते योगेश खैरे यांना फोनवर बोलतात. या ऑडिओ क्लिपची महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन पुष्टी करत नाही.