Nashik : शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग
शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे. ६० प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल होताच वॉटर सॅल्युट करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी फुल आणि साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन स्वागत केले.