Authored byमानसी देवकर | Contributed byनयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम30 Mar 2025, 10:34 am
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असं केलेलं वक्तव्य आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर गुढी पाडव्यादिवशी काळी गुढी उभारून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी 100 दिवसाच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचं आश्वासन दिले होते, भाजपने काढलेल्या जाहीरनाम्यामध्ये सदर कर्जमाफीचा उल्लेख होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वतःचे व सरकारचे अपयश दाखवून दिले आहे, असं म्हणत शतेकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय..