Suspended PSI Ranjit Kasle on Dhananjay Munde : निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक काळात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गाड्या अडवल्या म्हणून आपली बदली केली, असा आरोप रणजित कासले यांनी केला आहे.
रणजित कासले यांचे आरोप काय?
“विधानसभेची निवडणूक पार पडली त्यामध्ये मला परळी या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यादिवशी रात्री पेट्या येणार होत्या. त्यामुळे माझी अचानक रात्रीतून बदली केली. कारण त्यांना समजलं की, कासले ट्राफीकला आहेत. त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या काही गाड्या पकडल्या. आमच्या पीआयने तर काही कारवाई करु दिलीच नाही. पण गाड्या पकडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हाच तो कासले, त्याला या ठिकाणी ठेवायला नको, ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या”, असं रणजित कासले म्हणाले.
“मला सांगितलं की, तुम्हाला ड्युटी नाही. मी म्हणालो की, का सर बंदोबस्त तर फार कमी आहे? आपण गुजरात इथून तिथून पोलीस बोलावली आहेत. ते म्हणाले, तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही. मी विचारलं, का सर? सगळ्यांना ड्युटी लावली पण मला लावली नाही. मी सगळ्यांना विचारपूस केली. मला वेगळं वाटायला लागली. दुपारच्या 12 वाजता एक मित्र आले. ते म्हणाले, चला आपण जेवायला जाऊयात”, असं रणजित कासले यांनी व्हिडीओ सांगितलं आहे.‘Aaditya Thackeray यांची नार्को टेस्ट करा’, Bhavana Gawali विधान परिषदेत आक्रमक
‘मी चार लोकांच्या पाया पडलो की, मला सोडून द्या’
“त्याआधी एक गोष्ट आली. माझ्या अकाउंटला अचानक 10 लाख रुपये आले. संत बाळूमामा कंस्ट्रक्शन या अकाउंटवरुन माझ्या बँक अकाउंटनर त्याचदिवशी 10 लाख रुपये आले. का आले 10 लाख रुपये? याचा शोध लावायचा. एवढा बंदोबस्त कमी असताना, का ड्युटी लावली नाही? त्या दिवसाचं माझं लोकेशन काढा. मला करमाळ्यापर्यंत घेऊन गेले. बार्शीपर्यंत नेलं. मी चार लोकांच्या पाया पडलो की, मला सोडून द्या. त्यावेळेस माझ्या एका जवळच्या मित्राला फोन केला. मी त्याला म्हणालो की, मला वाचव. त्यानंतर तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. याचाही शोध लागला पाहिजे. बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे”, असा दावा रणजित कासले यांनी केला.