Naresh Mhaske on Congress and UBT Shiv Sena : खासदार नरेश म्हस्के यांनी काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेवर टीका करत ते आघाडी ‘इंडिया’ नसून ‘औरंगजेब फॅन क्लब’ असल्याचं म्हटलं आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संसदेत त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक २०२५ सादर केले आहे. या विधेयकावर शिवसेना पक्षाच्या वतीने बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.
Kunal Kamra Controversy: कुणाल कामरा माफी मागत नाही, पण बाहेर तर पडेल, कुठे लपणार? शिवसेना नेत्याचा कॉमेडियनला इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या दूरदृष्टीमुळे सहकार क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा घडून आल्या आहेत. आज ‘सहकार’ आणि ‘सरकार’ दोन्ही मजबूत होत आहेत. गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी कलम ३७० हटवून देशाच्या एकतेला नवा आयाम दिला आणि आता सहकारी क्षेत्रात सुधारणा करून लोकांना सक्षम बनवत आहेत. या उलट काँग्रेसच्या काळात सहकार क्षेत्राचा वापर भ्रष्टाचारासाठी केला गेला. जिथे आमच्या काळात ‘सहकारातून समृद्धी’ येत आहे, तिथे काँग्रेसने शेतकऱ्यांचे पैसे लुटून सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराचे अड्डे बनवले. ही तीच काँग्रेस आहे जी देशाच्या विकासावर गोचडीसारखी चिकटून राहिली. आज ते औरंगजेबच्या नावाने राजकारण करत आहेत, पण इतिहास सांगतो की औरंगजेबने `जिझिया कर’ लावून हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अनेक घोटाळे करून देशाला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचे काम केले. ही `इंडिया’ आघाडी नसून ‘औरंगजेब फॅन क्लब’ असल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
Vehicle Rule News : व्यावसायिक वाहनांवरील संदेश आता मराठीतच, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारचा मोठा निर्णय; RTO ला सूचना
Naresh Mhaske : भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानणारी काँग्रेस आणि उबाठा आघाडी ‘इंडिया’ नसून ‘औरंगजेब फॅन क्लब’; नरेश म्हस्केंची टीका
त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक भारतातील सहकारी चळवळीला नवीन उंचीवर नेईल आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनण्यासाठी सक्षम आहे. या विधेयकामुळे गुजरातमधील `इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद’ (IRMA) ला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल. सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनावर भर दिला जाईल. विद्यापीठाला डिग्री कोर्स, डिस्टन्स लर्निंग, ई-लर्निंग आणि देश-विदेशात शाखा स्थापन करण्याचा अधिकार असेल. ५०० कोटींच्या भौतिक संरचनेच्या निर्मितीसाठी सरकारने यात तरतूद केली आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक २०२५ हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. सहकारी क्रांतीला मजबुती मिळावी यासाठी संसदेतील सर्व खासदारांनी या विधेयकास पाठिंबा द्यावा, असे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी शेवटी केले.

