Akola News : अकोला शहरातील जेतवन नगरमध्ये एका तरुणावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मजुरीचे पैसे घ्यायला गेलेला करण घरी परतलाच नाही.
वृत्तानुसार, मृत तरुणाचे नाव करण चितडे आहे. पगार घेऊन येतो, असे सांगून निघालेल्या करणला मारहाण करण्यात आली. त्याने ही माहिती आईला फोनवर दिली. आई त्याला वाचविण्यासाठी पोहचेपर्यंत करण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, असे करणच्या आईने सांगितले आहे.
Meerut Murder Case: सौरभला संपवून मुस्कान-साहिल ६ दिवस हॉटेलमध्ये, खोली क्र. २०३ मधील धक्कादायक गुपित उघड
करणची आईने असेही सांगितले की, आठवडाभर मोलमजुरी केल्यावर रविवारी मजुरीचे पैसे घ्यायला गेलेला करण परत आलाच नाही, तोंडावरच मोठ्या बहिणीचं लग्न आल होतं आणि अशातच हा अनर्थ घडला आहे. करण दशरथ चितडे असे मृताचे नाव असून त्याचे वय २० होते. तर विशाल वरोटे वय ३० आणि वैभव चितडे वय २२ अशी जखमींची नावे आहेत.
युवकाची हत्या, मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर
दरम्यान या थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. या घटनेत मृतकाचे साथीदार तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. नेमकी हत्या का करण्यात आली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु अशा घटना दिवसाढवळ्या होत असल्यामुळे अकोला शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

