• Tue. Sep 22nd, 2026

Chitra Wagh : ‘माझ्या कॅरेक्टरवर सतत वेडंवाकडं बोलण्याचा प्रयत्न’, चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

Chitra Wagh : ‘माझ्या कॅरेक्टरवर सतत वेडंवाकडं बोलण्याचा प्रयत्न’, चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

Chitra Wagh on Sushma Andhare : “जेव्हा तुमच्याकडे बोलायला काही नाही तेव्हा चित्रा वाघ आणि मग किती पुरुष पायाला बांधले, अरे ही नीच प्रवृत्ती आहे. कधी थांबणार? पुरुष नाही ह्यांच्यासारख्या. ह्यांच्या डोक्यात स्त्री-पुरुषाला जोडण्याशिवाय काहीच नाही. म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच येणार”, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात वाकयुद्ध रंगलेलं आहे. चित्रा वाघ यांनी काल आमदार अनिल परब यांना उत्तर देताना जे वक्तव्य केलं होतं त्याचा दाखल देत सुषमा अंधारे यांनी ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर घणाघात केला होता. त्यावर आता चित्रा वाघ यांनी माध्यमांसमोर येत भूमिका मांडली. “ह्यांची लायकी तीच आहे. ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्ये करतो. सुषमा अंधारे यांनी काल ज्या पद्धतीने माझ्याबद्दल ट्विट केलं, ते नेहमीच करतात. माझ्या कॅरेक्टरवर सतत वेडंवाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो. आता विरोधी पक्षातल्या आधीच्या सगळे बोलून बोलून थकले. आता ह्यांचे सुरु झाले आहेत”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“मला प्रश्न पडलाय, हे प्रश्न अजून किती वर्षे विचारणार? माझ्या कॅरेक्टरला धरुन एकच प्रश्न जो विचारला जातो, जे बोललं जातं, ज्या पद्धतीने, अरे तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय? बरं विषय त्यांचा नव्हताच. मी का बोलले? कारण त्यांच्या नेत्याने अनिल परब यांनी माझ्याकडे बोट दाखवून चित्रा वाघ असं म्हणून मला प्रश्न विचारला, उत्तर देऊ नको?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.

वाघ यांचा अंधारेंवर घणाघात

“हा प्रश्न फक्त एकट्या चित्रा वाघचा नाहीय. अहो तुम्ही महिलांवर दादागिरी करता? तुम्ही असाल मोठे शहाणे. पण महिलांचा अपमान करायचा, दादागिरी त्यांच्यावर करायचा, त्यांचा आवाज दाबायचा अधिकार कुणी दिला? आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा मेसेज होता. पण या सटर फटर वटवाघळांना त्यांची लायकी तेवढी आहे. कुठल्याही परिस्थितीतून घाणेरडं काहीतरी निर्माण करायचं आणि बोलायचं”, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

“सुषमा अंधारे काल माझ्याबद्दल इतकं घाण बोलल्या. अरे आम्हालाही घर-दार, संसार आहे ना? आम्ही काय रस्त्यावर पडलोय? मी एकच प्रश्न विचारला, तो जो कोण त्यांचा नवरा होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही. तो येऊन येऊन मीडियासमोर सांगतोय की, त्या लेकराचा डीएनए टेस्ट करा. खरंतर मला हे बोलताना वाईट वाटतंय. त्या लेकराचादेखील त्यात दोष नाही. तुम्ही आमचं बोलता. आम्ही तुमचं बोललो तर? तुमच्यात आणि आमच्यात फरक राहिला नाही”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
Aaditya Thackeray : ‘पवारांनी शिंदेंचा सत्कार केला याचं दु:ख झालं’, आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
“माझं नाव घेऊन बोलले म्हणून मी त्यांना उत्तर दिलं. तो विषय मनिषा कायंदे यांनी काढला. मीच नाही आणखी काही सहकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. महिलांना हलक्यात घेऊ नका हा स्ट्राँग मेसेज यातून दिलाय. आमचा नवरा, मुलं काय करतात याचं तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही मुद्द्यावर बोलाना, हेच तर मी म्हटलं. हे कधी होतं, जेव्हा तुमच्याकडे बोलायला काही नाही तेव्हा चित्रा वाघ आणि मग किती पुरुष पायाला बांधले, अरे ही नीच प्रवृत्ती आहे. कधी थांबणार? पुरुष नाही ह्यांच्यासारख्या. ह्यांच्या डोक्यात स्त्री-पुरुषाला जोडण्याशिवाय काहीच नाही. म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच येणार”, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed