• Mon. Aug 3rd, 2026

    Crime News: पोस्टमनकाकाने केसाने गळा कापला! १४ वर्षीय मुलीला घरी बोलावून अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर भांडाफोड!

    Crime News: पोस्टमनकाकाने केसाने गळा कापला! १४ वर्षीय मुलीला घरी बोलावून अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर भांडाफोड!

    Ratnagiri News: कुटुंबाशी ओळख असलेल्या एका पोस्टमनने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    पोस्टमनकाकाने केसाने गळा कापला! १४ वर्षीय मुलीला घरी बोलावून अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका पोस्टमनने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोस्टमनने एका १४ वर्षाच्या मुलीवर ओळखीचा गैरफायदा घेत अनेकदा लैंगिक अत्याचार केला असून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात रविवारी मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांकडून वेगाने चक्रे फिरवत खेड तालुक्यातील संशयित आरोपी नरेश बाबाजी मोरे या ५६ वर्षीय पोस्टमन असलेल्या इसमाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर करण्यात आले असता संशयित आरोपी मोरे याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती खेड पोलिसांनी दिली.

    खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत पोस्टाच्या कामासाठी स्वतःच्या घरी पीडित मुलीला बोलावून अनेकदा लैंगिक अत्याचारकेल्याचे तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. पोस्टमन आणि पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाचा परिचय होता. याचाच गैरफायदा घेत नराधम पोस्टमनने पीडिती मुलीववर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. ही बाब कोणाला सांगितल्यास कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी पीडितीला पोस्टमनने दिल्यामुळे तिने ही बाब कोणाला सांगितली नाही. मात्र यातच ही मुलगी गर्भवती राहिल्याचे २८ जुलै २०२६ रोजी मुलीच्या पालकांच्या लक्षात आले.

    ही गंभीर बाब आल्याने पीडितेच्या पालकांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारतीय डाक विभागातील कर्मचाऱ्याकडूनच अशी घटना झाल्यामुळे संताप व्यक्त होत असून खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी आणि पालकांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी आरोपी पोस्टमनवर पॉक्सो अंतर्गत विविध कालमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

    दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास खेड पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा