Devendra Fadnavis On Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका करताना त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. मागील काही दिवसांपासून संजय राऊत हे सातत्याने भाजपावर टीका करताना दिसत आहेत. आता मुख्यमंत्र्यांकडून राऊतांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांच्याबद्दल अत्यंत स्पष्टपणे बोलताना दिसले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊतांना स्वत: चा तपास करून घेण्याची गरज आहे. आता अनेक चांगले मानसोपचार रूग्णालये सुरू झाली आहेत. जर आवश्यकता असेल तर आम्ही सरकारच्या वतीने सर्व त्याचा खर्च करू. अगदी आवश्यकता पडली तर मला कोणीतरी सांगितले की, सिंगापूरचे मानसोपचार रूग्णालय खूप चांगले आहे तिथेही त्यांना पाठवायचे असेल तर त्याही करिता सगळा खर्च सरकार देईल.
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांवर संतापले संजय राऊत, म्हणाले, वर्षा बंगल्यातून बाहेर पडून डोक्याला रूमाल बांधा आणि…आजच मी जाहीर करतो, बजेटमध्येही त्याची तरतूद करतो पण त्यांनी तपास एकदा करून घ्यावा. संजय राऊतांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावेत, असेच थेट देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हे ‘एबीपी माझा’च्या माझा व्हिजनमध्ये बोलत होते. नागपूर हिंसाचाराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, सोशल मीडियावरील काही पोस्ट या बांगलादेशातल्या भाषेतून आहेत. आताच त्यावर बोलणे योग्य ठरणार नाहीये. बाकी तपास हा सुरू आहे. हा व्यापक कटाचा भाग असल्याचे संकेत देखील देण्यात आले.
पुढे दिशा सालियान प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सरकारचे स्पष्ट आहे की, कोर्टात काय होईल आणि कोर्ट काय म्हणेल यावर सरकारची पुढची भूमिका असेल. आतातरी शासनाच्या स्तरावर किंवा पोलिसांच्या स्तरावर हा विषय नाहीये, हा कोर्टात विषय आहे. कोर्टाचा काही निर्णय येईल, त्यावेळी सरकार भूमिका घेईल. आता सध्या आम्ही कोर्टाकडे नजर ठेऊन आहोत. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही बोलताना फडणवीस दिसले.

