मुदत एप्रिलची, तारीख मे महिन्याची! एचएसआरपी नंबरप्लेटबाबत गोंधळ, दंड भरावा लागण्याची भीती, तोडगा काय?
पुणे : ‘उच्च सुरक्षा नंबर प्लेट’ (HSRP Number Plate) बसविण्यासाठी एप्रिल २०२५ अखेर मुदत देण्यात आली आहे. पण, अनेक नागरिकांना ‘सुरक्षा नंबर प्लेट’ बसविण्यासाठी मे महिन्यातील तारखा दिल्या जात आहेत. त्यामुळे दंड भरावा लागणार अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, ‘सुरक्षा नंबर प्लेट’ बसविण्यामधील गोंधळ सुरूच आहे. नंबर प्लेट बसविण्याचे काम घेतलेल्या कंपनीकडून सुरू असलेल्या संथ कामाचा फटका (Pune News) नागरिकांना सहन करावा लागत आहे.