Harshwardhan Sakpal On Devendra Fadnavis – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले होते. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना ही कारभाराच्या अनुषंगाने आहे. भाजपाच्याच लोकांनी फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केलेली आहे. फडणवीसांना त्यांच्याच पक्षातील लोक हे औरंगजेब ठरवू पाहत आहेत. बावनकुळे, राणे हे ज्यापद्धतीची माझ्याबद्दल भाषा वापरत आहेत. ती विचित्र स्वरुपाची आहे. स्वत:ला सुसंस्कृत पक्षातील समजणारे लोक काय शब्दावली वापरत आहेत. या सगळ्या प्रकरणाने भाजपचा चेहरा समोर येईल.
महाराजांचा अपमान करणाऱ्याला सुरक्षा
फडणवीसांच्याबद्दल काय बोलले गेले तर महाराष्ट्राची अस्मिता लयास जाते असे बावनकुळे बोलतात तर शिवाजी महाराजांबद्दल अश्लील बोललं तर महाराष्ट्राची अस्मितेला ठेच पोहचत नाही? महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकरला सुरक्षा दिली जाते. कोरटकरला सुरक्षा दिली जाते. त्यांच्याबद्दल बजरंग दल, विश्व हिंदू परिषद बोलत नाही तसेच भाजपचा एकही नेता बोलत नाही.
क्रुर शासन का ?
क्रुर शासन का म्हणाले या प्रश्न विचारला असता सपकाळ यांनी उत्तर दिले ते म्हणाले की, दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे. महिला शोषणाचे नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. बलात्काराची घटना झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यचा गृह राज्य मंत्री म्हणतात पीडित महिलेने आरोडा ओरडा केला नाही म्हणून बलात्कार झाला. खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात येत आहे. सतोंष देशमुखांसारख्या सरपंचाची हत्या होते. ही सर्व प्रकरण दर्शवतात की तसेच कोयता गँग, आका, खोक्या अशाप्रकारचे शब्दावली आणि नवनवीन गुंड समोर येत आहेत. त्यामुळे हे दर्शवतात की हे तितकेच क्रुर शासन आहे.

