Chandrashekhar Bawankule News : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज(१४ फेब्रुवारी) सकाळी सात वाजल्यापासून आपल्या कार्यकर्त्यांसोबत धुळवडीचा उत्सव साजरा करत आहेत. मतभेद विसरुन एकत्र येण्याचा होळी हा सण असल्याचे ते म्हणाले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज(१४ फेब्रुवारी) सकाळी सात वाजल्यापासून आपल्या कार्यकर्त्यांसोबत धुळवडीचा उत्सव साजरा करत आहेत. मतभेद विसरुन एकत्र येण्याचा होळी हा सण असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी त्यांना होळीच्या शुभेच्या कोणाला कशाप्रकारे द्याल अशी विचारणा केल्यावर त्यांनी, संजय राऊतांना शुभेच्छा देत, रोज सकाळी ९ वाजताचा शिमगा त्यांनी बंद करावा आणि महाराष्ट्राच्या विकासाकरिता सुचना कराव्यात असा टोला लगावला. पुढे, उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले की, ” उद्धव ठाकरेंनी रोज सभागृहात यावं आणि महाराष्ट्र कसा पुढे नेता येईल याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कराव. अडीच वर्षात त्यांनी काय काय केलं हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहात कधी कधी न येता रोजच सभागृहात यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं” असे ते म्हणाले.
देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. त्यांचा दृष्टिकोन हा महाराष्ट्राला नंबर एकचं राज्य बनवण्याचं आहे. त्यामुळे, सर्वच पक्षांनी, धर्मांनी, आम्ही सर्वांनी आणि महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेनं त्यांना मजबुत करण्यासाठी पाठींबा द्यावा. असे यावेळी शुभेच्छा देताना बावनकुळे म्हणाले.
अजित दादांना शुभेच्छा देताना बावनकुळे म्हणाले की, “मी अजित दादांना शुभेच्छा देतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाकरिता या वेळेस जसा अर्थसंकल्प सादर केला, तसाच पुढच्या वेळेसहि करावा.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बावनकुळे यांनी शुभेच्छा देत म्हटले की, शिंदे साहेबांनी अल्पावधीतच महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रच राहुन महाराष्ट्राचा विकास करावा असे ते म्हणाले.

