• Sat. Mar 7th, 2026

    jay pawar : अजित पवारांचे पुत्र जय पवार शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळे यांच्याकडून फोटो शेअर

    jay pawar : अजित पवारांचे पुत्र जय पवार शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळे यांच्याकडून फोटो शेअर

    Jay Pawar Meet Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी शेअर केले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. जय पवार यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचीदेखील भेट घेतली आहे. त्यांच्या कौटुंबिक भेटीचे फोटो आता समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह सुप्रिया सुळे यांनी “अभिनंदन जय आणि ऋतुजा! खूप आनंद झाला. आनंदी राहा, दोघांना आशीर्वाद”, असं म्हटलं आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक पक्षावर वर्चस्व मिळवलं आहे. अजित पवार यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर त्या आमदारांना अजित पवार यांनी निवडून देखील आणलं. याशिवाय अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वयाच्या 83 व्या वर्षी पुन्हा शुन्यापासून सुरुवात करावी लागली.

    शरद पवार यांनी तरीही हार मानली नाही. त्यांनी विधासभा आणि लोकसभा निवडणुकीत राज्यभर फिरत आपली जादू दाखवून दिली. पण सत्तेशिवाय कामे होत नाहीत या धोरणेतून अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्याबाजूने उभं राहणं पसंत केलं. या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात टोकाची टीका-टीप्पणी बघायला मिळते. असं असलं तरी या राजकरणाचा पवार कुटुंबावर फार मोठा परिणाम पडलेला नाही. कारण पवार कुटुंबिय आजही एकमेकांच्या सुख-दु:खात एकत्र येतात. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो हा त्याबाबत अत्यंत बोलका असा आहे.

    अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचीदेखील भेट घेतली. पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी इन्साग्रामवर शेअर केले आहेत. त्यावर अनेकांनी वेगेवगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापैकी एका युजरने “याला म्हणतात नाते जपणे” असं म्हटलं आहे. तर अनेकांनी जय पवार यांचं अभिनंदन केलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed