Latur Crime News: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ माजलेली असताना आता लातुरात भरदिवसा भररस्त्यात एका तरुणाला पाच जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने लातुरात एकच खळबळ उ़डाली आहे.
घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले. जखमी व्यक्तीला तोपर्यंत लोकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही आणि इतर माहिती गोळा केली आहे. हे पाच जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.
ज्या व्यक्तीला मारहाण झाली ती व्यक्ती हरवाडी येथील असल्याची माहिती आहे. अजय हिजोळे असे ३५ वर्षीय जखमी व्यक्तीचे नाव आहे. लातूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे आणि गांधी चौक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आरोपीचा शोध घेत आहेत.
पाहा तो भयंकर व्हिडिओ –
https://x.com/mataonline/status/1899473330597675186
पाच लोकांनी एका व्यक्तीला केलेली जबर मारहाण अतिशय भयानक होती. ज्या व्यक्तीला मार लागला आहे त्या व्यक्तीच्या डोक्यात लाथा घालून शिवीगाळ करण्यात आली होती. पूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आंबेजोगाई रोडवरील राजश्री बारमध्ये ही लोक दारू पीत बसली होती. बारमध्ये भांडण सुरू झालं. या भांडणात बिअरच्या बॉटल मारत भांडण वाढत गेलं. बिअर बारच्या बाहेर आल्यानंतर ही भांडण सुरूच होतं. त्यानंतर ही सर्व लोक लातूर आंबेजोगाई रोडवर आली. या ठिकाणी भांडण मोठ्या प्रमाणात वाढलं. पाच लोकांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली.
चार चार जणांना ताब्यात घेतले
या प्रकरणातील चार आरोपींना शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि ताब्यात घेतले आहे. यामधील दोन तरुण खेळ सर्राइक गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले.