Nagpur HSRP Number Plate : नागपुरात एकाने २०१९ नंतर स्कूटर विकत घेतली. तरीदेखील त्यांच्या स्कूटरला डिलरकडून साधीच नंबर प्लेट देण्यात आली. त्यानंतर त्यांनी डिलरकडे याबाबत सांगितलं असल्यास त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली.
राज्य परिवहन विभागाच्यावतीने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसवण्याचे निर्देश दिले आहेत. १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर या नंबरप्लेट नाहीत. त्यामुळे ३१ मार्च २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा राज्य परिवहन शाखेकडून देण्यात आला. १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत वाहनांवर एचएसआरपी आधीच बसवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वाहनांना नव्या नंबरप्लेट बसवण्याची गरज नाही.
नवी नंबरप्लेट आवश्यक, RTO कडून ३१ मार्चपर्यंत मुदत; कोणत्या वाहनासाठी किती पैसे भरावे लागणार?
‘एचएसआरपी’ नंबर प्लेट्स विशेष प्रकारच्या अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या असून, त्यावर परावर्तीत रंग आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. या प्लेट्स सौरहेटीव्ही कॅमेन्यांद्वारे सहज ओळखल्या जाऊ शकतात, ज्यामुळे वाहन चोरी आणि बनावटगिरी रोखण्यास मदत होते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी काही गाड्यांना या प्लेट बसवण्यातच आल्या नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.
HSRP Number Plate : हाय सेक्युरिटी नंबर प्लेट विरोधात मनसे आक्रमक, HSRP कशासाठी? मनसेचा सवाल; मुख्यमंत्र्यांना पत्र देत विरोध
मोबाइल लिंक करा
मोबाइल क्रमांक वाहनाशी लिंक असणाऱ्यांनाच ऑनलाइन नंबर प्लेटसाठी अर्ज करता येतो.
HSRP Plate Rules : वाहनाची खरेदी २०१९ नंतरची तरी साधीच नंबरप्लेट दिली, डिलरकडून उडवाउडवी; अशा परिस्थितीत काय कराल?
‘आरटीओ’त करा तक्रार
राजेश उदेपूरकर यांनी पत्नी नमिता यांच्या नावे २७ मे २०१९ रोजी टेलिफोन एक्स्चेज परिसरातील एका डिलरकडून स्कूटर खरेदी केली. ‘एमएच ४९ बीएफ४४८९ असा गाडीचा नंबर आहे. htps://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्यांनी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, १ एप्रिल २०१९ नंतरच्या गाड्यांची नोंदणीच होत नसल्याचे पुढे आले. डिलरशी संपर्क साधला असता असा कुठलाही आदेश आम्हाला प्राप्त झाला नसल्याचे त्याने संगितले. त्यामुळे उद्देपूरकर यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘मटा’ने प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी आरटीओत तक्रार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

