Devendra Fadnavis news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करताना विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. कोणताही निर्णय आम्ही तिघे मिळूनच घेत असल्याचे स्पष्ट बोलताना फडणवीस हे दिसले. यावेळी ते अजित पवार यांच्याबद्दलही बोलताना दिसले आहेत.
पुढे फडणवीस म्हणाले की, स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाहीये. यापूर्वी देखील मी स्पष्ट केले की, जे जे राज्याच्या हिताचे आहे, ते ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरूवातीला मी होतो नंतर दादाही होते. त्यामुळे घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी एकटा शिंदेंची नाही तर तिघांची आहे. ज्याठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या. त्याठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलीये. सरकार आपणही चालवलंय बऱ्याचदा खालच्या स्तरावर गडबडी होतात.
सतीश भोसलेवर सुरेश धसांचा आर्शिवाद?, नवीन कारनामे उघड, गाडीवर चढून पाडला पैशांचा पाऊसविभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरीही देवेंद्र फडणवीसांचा दणका, खात्याच्या मंत्र्याने जरी स्थगिती दिली तरीही फडणवीसांचा शिंदेंना दणका एक गोष्ट सांगतो की, दादांचे काय आहे ते थेट अटॅक करतात ना…त्याच्यामुळे फार कोणी त्यांच्या वाटं जात नाही. एक गोष्ट सांगतो की, हे समन्वयाने चालणारे सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही जेही निर्णय घेत आहोत, ते तिघे मिळून घेतो. काही बैठकांना दादा असतात काही बैठकांना शिंदे साहेब असतात.
कधी दोघेही असतात. मात्र, जो आला नाही तो नाराज असल्याचे सांगितले जाते. पुढे फडणवीस म्हणाले की, १ लाख ३० हजार ग्राहकांनी रूफटॉप सोलर लावली. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वीज खरेदीचा दर आपण कमी केला. ९५ टक्के ग्राहकांना वीज दरात दिलासा मिळाला. स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना दिवसाच्या वीजेत १० टक्के सूट देण्याचा असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

