• Sat. Apr 26th, 2025 2:34:02 AM
    मुंबईत १२ वर्षाच्या मुलीवर ५ नराधमांकडून अत्याचार, मोठी खळबळ

    Mumbai News : मुंबईत जोगेश्वरी परिसरात १२ वर्षीय मुलीवर ५ आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झालीये. पुण्यातील स्वारगेट आगारातील मुलीच्या अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतील जोगेश्वरी परिसरात पाच नराधमांनी मिळून एका १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केलाय. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळतंय. आरोपींवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार करण्यात आला आहे. अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला दादर परिसरात आणून सोडले असल्याची माहिती आहे.

    पाच जणांकडून करण्यात आला १२ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

    यासोबतच या अत्याचाराप्रकरणी मोठी माहिती पुढे येताना दिसतंय. आरोपी हे एसी मेकॅनिक असल्याचे कळतंय. लैगिंक अत्याचारानंतर मुलीला दादर परिसरात आरोपींनी सोडले. मुलीला एकटे पाहून आरोपींनी तिला घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. दादर परिसरात मुलगी फिरत असताना पोलिसांचे तिच्यावर लक्ष गेले आणि पोलिसांनी तिची चाैकशी केली असता तिने घडलेला सर्वप्रकार पोलिसांना सांगितला.
    Sambhajinagar : ऊन वाढले; बाष्पीभवनही वाढले, भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यतामुंबईमध्येही महिला आणि मुली असुरक्षित?

    त्यानंतर आरोपीची शोधाशोध सुरू झाली. मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या पाच जणांकडून अधिकची माहिती ही घेतली जातंय. या आरोपी आणि मुलीची ओळख अगोदरच होती का? याबद्दलही पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.

    राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    परत एकदा राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बघायला मिळतंय. स्वारगेट आगारात एका २६ वर्षीय मुलीवर सराईत गुन्हेगाराकडून अत्याचार करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून धक्कादायक खुलासा होताना दिसत आहेत. मुंबईतही मुली सुरक्षित नसल्याचे यावरून आता दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचार वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed