• Mon. Apr 21st, 2025 6:18:51 AM
    शिंदेंनी नियुक्त केलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्याला फडणवीसांनी हटवलं; भाऊ, भाईंचं शीतयुद्ध टोकाला?

    Eknath Shinde: सत्तास्थापना, खातेवाटप, पालकमंत्रिपद यावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुरु झालेलं शह-काटशहाचं राजकारण दिवसागणिक अधिकाधिक टोकाला जाऊ लागलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: सत्तास्थापना, खातेवाटप, पालकमंत्रिपद यावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुरु झालेलं शह-काटशहाचं राजकारण दिवसागणिक अधिकाधिक टोकाला जाऊ लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोरासमोर येण्याचं टाळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बऱ्याचशा बैठकांना शिंदे अनुपस्थित राहतात. शिंदे यांच्या कार्यकाळातील काही निर्णय फिरवण्यात आले आहेत, तर काही निर्णयांना स्थगिती देऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

    शिंदेंच्या कार्याकाळातील कोणत्याच निर्णयाला स्थगिती दिली नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस नुकतेच म्हणाले. आमच्यात कोणतंही कोल्ड वॉर नसल्याचा उच्चार दोन्ही नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केला. यानंतर आता कैलाश जाधव यांना कार्यमुक्त केल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सेवानिवृत्त झालेल्या कैलाश जाधव यांची एमएसआरडीसीचे संयुक्त संचालक म्हणून नियुक्ती केली होती. जाधव यांना आता कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. त्यांना सेवेतून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो.
    Ram Kadam vs Bhaskar Jadhav: बघतोच तुला आता! ठाकरेंवर आरोप; भर विधानसभेत भास्कर जाधव, राम कदम भिडले; जोरदार जुंपली
    सेवानिवृत्त जाधव यांचया जागी वैदेही कानडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कैलाश जाधव यांना सेवानिवृत्तीनंतर एमएसआरडीसीच्या संयुक्त संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचा विस्तारित कार्यकाळ २०२६ पर्यंत होता. पण त्याआधीच त्यांना हटवण्यात आलेलं आहे. शिंदेंनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला हटवून फडणवीसांनी दिलेल्या मेसेजची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यात पहाटे ४ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरु असलेल्या कुरघोड्यांबद्दल तक्रार केली होती, असा सनसनाटी दावा शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. पण शिंदे आणि शिवसेनेनं त्यांचा दावा खोटा असल्याचं सांगितलं.
    Aditya Thackeray: आदित्य ठाकरे CM फडणवीसांच्या भेटीला, कारणही समोर; वाढत्या भेटीगाठींमागे शिंदे कनेक्शन?
    सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे. तर एमएसआरडीसी खातं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे जाधव यांच्या कार्यमुक्तीच्या निर्णयाकडे फडणवीसांच्या सरकारमधील वाढत्या वर्चस्वाच्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. एमएसआरडीसी विभागाकडून अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले जात आहेत. पायाभूत प्रकल्पांवर हा विभाग काम करतो.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed