Maha Vikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांसाठी उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीची उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार तर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे उद्या संध्याकाळी चार वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव, विधान परिषदेचं उपसभापतीपद जाणार?
बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?
महाविकास आघाडीचे आमदार अनेक दिवसांपासून एकत्र आलेले नाहीत. त्यामुळे या बैठकीच्या निमित्ताने सर्व आमदार एकाच छताखाली आता एकत्र येणार आहेत. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवर कसं घेरायचं, सर्वसामान्यांच्या विविध मुद्द्यांसाठी आग्रही राहून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला कसं भाग पाडता येईल? यासाठी रणनीती आखण्याची चर्चा या बैठकीत होऊ शकते.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांचं बिगूल कधीही वाजू शकतं. त्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर काय स्थिती आहे, तिथे स्बळावर निवडणूक लढायची की वेगेवगेळी याबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदारांकडून माहिती जाणून घेण्याची शक्यता आहे.

