Latur Bus Accident : लातूरमध्ये बसला भीषण अपघात झाला असून या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या घटनेनंतर बसमधील प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस पलटली
नांदेडकडून लातूरच्या दिशेने येणाऱ्या बसचा आज दुपारी भीषण अपघात झाला आहे. चाकूर येथून निघालेली बस नांदगाव पाटीजवळ आली असता तेथील दुभाजकाजवळ अचानकरित्या समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात चालकाने विरुद्ध दिशेला बस घातली आणि रस्ता दुभाजकाच्या कठड्याला धडकल्याने बस पलटली. हा अपघात एवढा भीषण होता, की रस्त्यावर बस जवळपास ५० फूट घासत गेल्याचं प्रत्यक्षदर्शंनी सांगितलं.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्लाच्या कट, ISI कडून ट्रेनिंग घेतलेला संशयित ताब्यात; हँड ग्रेनेड जप्त
जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले
नांदेड – लातूर या बसचा नांदगाव पाटी येथे भीषण अपघात झाल्यानंतर यामध्ये एकूण ३६ जणांना लातूरच्या विलासराव देशमुख सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी सहा ते सात लोकांचे हात तुटून वेगळे झाले आहेत. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांवर लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात इलाज सुरू आहेत. यापैकी चार लोकांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टर उदय मोहिते यांनी सांगितलं.
Rajasthan News : कोल क्रशरमध्ये भयंकर अपघात, शरीराचे तुकडे, तर डोकं अद्याप गायब; घटनेने सर्वच हादरले
Latur News : अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस उलटली, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO, प्रवाशांचं काय?
प्रशासन अलर्ट मोडवर
जखमींना लातूरच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासन, वैद्यकीय विविध पथकं आणि डॉक्टरांची टीम यांनी मिळून प्रवाशांवर उपचार केले. डॉक्टरांची टीम मिळून जखमींना दवाखान्यात दाखल करुन घेणं आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार करणं, यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रशासनाला सूचना केल्या होत्या.

