Clash Between Shiv Sena UBT and Shinde Group Party Workers : ठाण्यात मोठा राडा बघायला मिळाला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात ठाकरेंचे नेते आणि पदाधिकारी ठाण्यात आनंद आश्रम येथे आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले. यावेळी आनंद आश्रमासमोर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला.
ठाण्यात प्रचंड राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. या दौऱ्याची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या नेत्यांची आज ठाण्यात सभा पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाच्या नेते आणि पादाधिकाऱ्यांनी ठाण्यात दाखल होताच आनंद दिघे यांना अभिवादन केलं. संजय राऊत आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी आनंद आश्रम परिसरात पोहोचले तेव्हा दोन्ही गट आमनेसामने आले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर अक्षरश: धावून गेले.
रोहिणी खडसे यांचा गंभीर आरोप, रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारे एकनाथ शिंदेंच्या आमदाराचे कार्यकर्ते?
ठाकरे गटाच्या नेत्यांची ठाण्यात सभा
ठाण्यात एमकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात ठाकरे गटाच्या नेत्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याआधी शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये मोठा राडा झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचा जोरदार प्रतिकार केला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर ठाकरे गटाकडूनही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, शिंदे गटाच्या आंदोलनावर खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांनी टीका केली. त्यांनी कितीही आंदोलन केलं तरी फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Maha Vikas Aghadi : ‘अशा सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणं म्हणजे…’, विरोधक आक्रमक, अधिवेशनात घेरण्याचा प्लॅन तयार
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून परिसराचं शुद्धीकरण
दुसरीकडे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद आश्रम परिसरात दुग्धाभिषेक करत त्या परिसराचं शुद्धीकरण केलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये सहानुभूती मिळावी यासाठी ठाकरे गटाकडून असे प्रयत्न केले जात असल्याची टीका शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली.

