• Mon. Sep 14th, 2026

‘दिलखुलास’ कार्यक्रमात फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांची १, ३, ४ आणि ५ मार्च रोजी मुलाखत – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 27, 2025
‘दिलखुलास’ कार्यक्रमात फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांची १, ३, ४ आणि ५ मार्च रोजी मुलाखत – महासंवाद




मुंबई दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘फलोत्पादन विभागाच्या योजना व अंमलबजावणी’ या विषयावर फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते, यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 1, सोमवार दि. 3, मंगळवार दि. 4 आणि बुधवार दि. 5 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात कृषी क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विविध फळपिके, भाजीपाला यांच्या उत्पादनात व उत्पादकतेत वाढ झाली आहे. ही उत्पादने नाशवंत असून त्यांची तात्काळ विक्री होणे आवश्यक असते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव तसेच ग्राहकांनाही वाजवी दरात शेतीमाल उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्याला फलोत्पादन क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. मोते यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed