• Sat. Apr 26th, 2025 6:46:08 PM

    ह्रदयद्रावक! भरधाव कार धडकली अन् फुटपाथवर आईसह झोपलेल्या १८ महिन्याच्या चिमुकल्याचा अंत; मातेचा काळीज चिरणारा आक्रोश

    ह्रदयद्रावक! भरधाव कार धडकली अन् फुटपाथवर आईसह झोपलेल्या १८ महिन्याच्या चिमुकल्याचा अंत; मातेचा काळीज चिरणारा आक्रोश

    Mumbai Horrible Accident : मुंबईमध्ये ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वडाळ्यामध्ये फूटपाथवर झोपलेल्या आईसह तिच्या १८ महिन्याच्या बाळाला कारने धडक दिली आहे, ज्यामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आई जखमी झाली आहे. हे पाहून मातेने काळीज चिरणारा आक्रोश केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मुंबईमध्ये ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वडाळ्यामध्ये फूटपाथवर झोपलेल्या आईसह तिच्या १८ महिन्याच्या बाळाला कारने धडक दिली आहे, ज्यामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आई जखमी झाली आहे. हे पाहून मातेने काळीज चिरणारा आक्रोश केला आहे. वडाळ्यातील बलराम खेडेकर मार्गावर ही घटना घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सकाळी या घटनेची पुष्टी दिली.

    महिलेचे नाव प्रिया निखिल लोंढे असून तिच्या मुलाचे नाव वर्धन आहे. ते शनिवारी रात्री फुटपाथवर झोपले होते तेव्हा कमल विजय रियाच्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, चिमुकल्याने जागीच प्राण गमावला आहे. तर त्याची आई प्रिया गंभीर जखमी झाली आहे. वृत्तसंस्थेनुसार, ४६ वर्षीय रियाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्या प्रकरणी तसेच मुलाच्या मृत्यूस जबाबदार धरत तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम १०६, १२५(ब) आणि २८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

    दरम्यान प्राथमिक तपासात असे समोर आले की, रियाने गाडी चालवताना मद्यपान केले नव्हते. परंतु अशा बेदरकारपणे रस्त्यावर भरधाव वेगात गाडी चालवण्याने वाहनचालकांसोबतच नागरिकांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न मात्र ऐरणीवर येतो.
    Mumbai Crime : दादरमधील गेस्टहाऊसवर क्राईम ब्रांचची धाड, १० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, दोघांना अटक
    दरम्यान पालघरमधूनही अशीच धक्कादायक घटना समोर आली होती. पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये कार चालकाने दारूच्या नशेत भरधाव वेगात जाऊन सात ते आठ वाहनांना धडक दिली होती. या अपघात मोठी जीवितहानी टळली होती. मात्र एक महिला गंभीर जखमी झाली. धक्कादायक म्हणजे, कारचालक हा वसईतील विद्याविकासनी शाळेचे मुख्याध्यापक होते. तर त्यांचे नाव मारिया दासो आहे. दारूच्या नशेत त्यांनी आपली टोयोटा कार भरधाव वेगात दामटवली. यामध्ये सात ते आठ वाहनं कचाट्यात आली. चालकाने प्रथम एका रिक्षाचालकाला उडवले, त्यानंतर एका वडापावच्या हातगाडीला धडक दिली. ज्यामुळे वडापाव खात असलेल्या महिलेच्या अंगावर गरम तेल पडले, ज्यामध्ये ती जखमी झाली. त्यानंतरही न थांबता त्याने अनेक वाहनांना कचाट्या घेतले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *