• Tue. Jun 16th, 2026
    कल्याण – डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला, सकाळीच्या वेळी भरगर्दीत काय घडलं?

    Kalyan Dombivli Crime News : कल्याण – डोंबिवलीदरम्यान ट्रेनमध्ये प्रवाशांवर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तिघे जखमी झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रदीप भणगे, डोंबिवली : कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. १९ वर्षीय इसम शेख जिया हुसेन नावाच्या तरुणाने खिशातला चाकू काढून तीन प्रवाशांवर हल्ला केला. धक्का लागण्यावरून प्रवाशांशी झालेल्या वादातून चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून एकच खळबळ उडाली.
    दादर स्थानकात तरुणीचे केस कापल्याची भयंकर घटना, आरोपी ताब्यात; दिलं धक्कादायक कारण

    नेमकं काय घडलं?

    मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांकरिया, राजेश अशोक चांगलानी या तीन प्रवशांनी कल्याण ते दादर ही सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांनी फास्ट लोकल ट्रेन कल्याण स्टेशनवरून पकडली होती. त्याच ट्रेनमध्ये आरोपी इसम शेख जिया हुसेन, वय १९ वर्षे, राहणार मुंब्रा, हा देखील त्याच कल्याण ट्रेनमध्ये चढलेला होता. तो मुंब्रा येथे उतरण्यासाठी कल्याणवरुनच चढला होता.
    गावाला जातो सांगून निघाला तो आलाच नाही, दोन दिवस बेपत्ता; नंतर तलावात मामा – भाच्याची बॉडी; काय घडलं?
    यावेळी ट्रेनमधील प्रवाशांनी त्या आरोपीला कल्याणवरुन निघालेली ही लोकल फास्ट ट्रेन आहे आणि मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही. प्रवाशांच्या या माहितीनंतर आरोपीने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीला सहप्रवासी लोकांना धक्का लागला. धक्का लागल्याच्या कारणावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादामध्ये आरोपीला त्या लोकांनी मारहाण केली.
    प्रसुतीदरम्यान रक्तस्त्राव, महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी न सांगताच गर्भाशय काढल्याचा कुटुंबीयांचा आरोप, पोलिसांत तक्रार

    वादानंतर थेट खिशातील चाकू काढून प्रवाशांवर हल्ला

    आरोपीला सहप्रवाशांनी मारहाण केल्यानंतर आरोपीने थेट खिशातील चाकू काढून त्या सहप्रवाशांवर चाकू हल्ला करत त्यांना मारहाण केली. या चाकू हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. प्रवाशांनी त्या आरोपीला ताब्यात घेऊन आरपीएफला कळवलं. आरपीएफ अंमलदार यांनी आरोपीला ठाणे रेल्वे स्टेशन इथे हजर केलं.

    कल्याण – डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला, सकाळीच्या वेळी भरगर्दीत काय घडलं?

    त्यानंतर प्रवाशांवर औषध उपचार करून तक्रार देण्याकरता सदरील तक्रारदार डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन इथे आले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed