सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : आईच्या जागी भलत्याच अनोळखी महिलेला दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करुन, तिच्या नावावर बनावट आधार कार्ड आणि बनावट मुखत्यारपत्र तयार करत स्वतःच्या आईचीच २० गुंठे जमीन हडपल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हा कट रचणारा मुलगा जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सिटीचौक पोलीस ठाण्यात मुलगा, सुनेसह इतर साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीबाई कडुबा सपकाळ , वय ६५, रा. चिंचोली लिबाजी, ता. कन्नड असे फसवणूक झालेल्या वृद्ध आईचे नाव आहे. त्यांनी आपला शिक्षक मुलगा भागवत कडुबा सपकाळ, सून सुनीता भागवत सपकाळ आणि इतर संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे.
मुलाचा पैसे देण्यास नकार
तक्रारदार लक्ष्मीबाई आणि त्यांचे वीज महामंडळातून निवृत्त झालेले पती शरणापूर येथील गट क्र. ४० मध्ये ४० गुंठे शेतजमीन बाळगून आहेत. २०२५ मध्ये आजारपणाच्या उपचारासाठी पैशांची गरज पडल्याने लक्ष्मीबाई यांनी आपली मुलगी यशोदाला २० गुंठे जमीन कायदेशीर विकून उपचाराचा खर्च भागवला. उरलेल्या खर्चासाठी त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या मोठा मुलगा भागवत याच्याकडे पैसे मागितले. मात्र, माझ्याकडे पैसे नाहीत, पण जमीन मला दिली तरच उपचारास मदत करेन, असे सांगून मुलाने नकार दिला.
Santosh Kendre : सुखबीर सिंग यांच्या प्राणांचं रक्षण, बादल कुटुंब धाडसी पोलीस अधिकारी संतोष केंद्रेंच्या पाया पडले, रोख बक्षीसही जाहीर
अनोळखी महिला उभी करून रचला कट
मुलाने मदत न केल्यामुळे आईने उर्वरित २० गुंठे जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकण्याची तयारी सुरू केली. जेव्हा त्यांनी जमिनीचा सातबारा आणि फेरफार काढला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ही जमीन आधीच त्यांचा मुलगा भागवत याच्या नावावर वर्ग झाली होती.
चौकशीअंती समोर आले की, मुलाने १७ फेब्रुवारी २०२५ रोजी निबंधक कार्यालयात स्वतःच्या ६५ वर्षीय आईऐवजी एका अनोळखी महिलेला उभे केले. तिच्यानुसार बनावट आधार कार्ड आणि बनावट मुखत्यारपत्र नोंदवून घेतले. त्यानंतर ४ एप्रिल २०२५ रोजी या बनावट मुखत्यारपत्राचा वापर करून स्वतःच्या नावाने बक्षीसपत्र तयार केले आणि आईची जमीन हडपली. या संपूर्ण कटात सून सुनीता, घनश्याम गंगावे आणि सुशील बोराडे यांनी मदत केल्याचा आरोप आहे.
E Challan : वाहतूक नियम मोडल्याचं चालान आल्यास घाई करा, हरकतीस केवळ 45 दिवसांची मुदत, दुर्लक्ष केल्यास दंड अनिवार्य
आधी जमीन विकताना विचारले नव्हते,सुनेची धमकी
आईने जेव्हा मुलाला जाब विचारला, तेव्हा सून सुनीता हिने तुम्ही आधी जमीन विकताना आम्हाला विचारले नव्हते, म्हणून आम्ही परस्पर जमीन आमच्या नावावर करून घेतली. आता जे करायचे ते करा, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू, अशी थेट धमकी दिली. शहरात भूमाफिया आणि बोगस जमीन खरेदी-विक्री टोळ्यांचे १६ गुन्हे आतापर्यंत दाखल झाले असून, त्यात एका शिक्षकानेच स्वतःच्या आईला फसवल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आर्थिक नियोजनाचे महिलांना मार्गदर्शन
दरम्यान, ‘आपल्या पैशांविषयी योग्य निर्णय घेण्यापूर्वी, संपत्ती बनवण्यासाठी; तसेच आपली व कुटुंबाची फसवणूक टाळण्यासाठी अगोदर आर्थिक साक्षरता महत्वाची आहे,’ असे विचार तज्ज्ञ यामिनी शाह यांनी व्यक्त केले.
Crime News : लग्नाला अवघे काही महिने उरलेले, आधी 25 वर्षीय तरुणीचा गूढ मृत्यू, काही तासांनी 26 वर्षीय भावी पतीचा लॉजमध्ये अंत सिद्धकला फायनान्शिअल ओपीडीतर्फे खास महिलांसाठी आर्थिक नियोजनावर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शाह यांनी बचत व गुंतवणूक यातील फरक समजून घ्या, असे आवाहन केले. ‘आपला कल गुंतवणुकीकडे वाढवला पाहिजे,’ असे त्या म्हणाल्या. ‘गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाकडे जीवन विमा व आरोग्य विमा आवश्यक आहे. महागाई असली तरी सध्या उपलब्ध पर्यायांमधून महागाईवर मात करता येऊ शकते. या पर्यायांमध्ये इक्विटी म्युचुअल फंड व स्टॉक मार्केटसारखे पर्याय आहेत. अर्थात स्टॉक वा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या विषयीचे ज्ञान घेणे हितकर ठरते. अन्यथा आर्थिक नियोजन कोलमडू शकते,’ असेही शाह यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा