Khulatabad News: श्रावण महिन्याला गुरूवारपासून सुरुवात झाली. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने मंदिरा परिसरात कडेकोट सुरक्षा देण्याची जबाबदारी महाराष्ट्र दलाकडे सोपवली.
कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश
श्रावण महिन्यात दर रोज, विशेषतः प्रत्येक सोमवारी, लाखो भाविक दर्शनासाठी वेरूळ येथे गर्दी करतात. या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांना ‘झटपट दर्शन’ घडवण्याचे आमिष दाखवून त्यांची दिशाभूल करणे आणि आर्थिक लूट करणे, असे गैरप्रकार मागील काही वर्षांत उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर, अशा दलालांवर आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश सुरक्षा यंत्रणेला देण्यात आले आहेत.
सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनाची बैठक
या सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनासाठी पार पडलेल्या बैठकीस उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, तहसीलदार संतोष गुट्टे, भारतीय पुरातत्त्व विभागाचे राजेश वाकलेकर, निवासी नायब तहसीलदार सुभाष पांढरे, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल दांडगे, विश्वस्त योगेश टोपरे, संजय वैद्य, मिलिंद शिवाळे, राजेंद्र कौशिके व इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
Sharad Pawar: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावरून शरद पवारांचा संताप; सरकारला कोणत्या सूचना केल्या?
दर्शन रांगा , प्रवेशद्वारावर लक्ष
भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे, यासाठी मुख्य प्रवेशद्वार, दर्शन रांगा; तसेच प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांसह सर्व संवेदनशील भागांत विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
Crime News : आईच्या जागी भलतीच बाई उभी केली, जन्मदात्रीची 20 गुंठे जमीन हडपली, आरोपी मुलगा निघाला जिल्हा परिषदेतील गुरुजी
घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला गर्दी
श्रावण महिन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली.वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग व श्री घृष्णेश्वर मंदिरात श्रावणानिमित्त श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.भक्तिमय वातावरणात भाविकांनी दर्शन घेतले. भगवान श्री घृष्णेश्वर महादेवांना जलाभिषेक,
दुग्धाभिषेक; तसेच विविध फुलांनी मनोभावे पूजा करण्यात आली. श्रावण महिन्याच्या प्रारंभी श्री घृष्णेश्वर मंदिरात ‘हर हर महादेव’ओम नम:शिवाय’ अशा जयघोषात मंदिर परिसर दणाणून गेला. भगवान घृष्णेश्वराच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या सुख, समृध्दी ,आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी आशीर्वाद मागण्यात आला.
