• Fri. Aug 14th, 2026

    Pune Crime: कंबर दुखतेय, मुलंही जागी आहेत; पत्नीने संबंधांना नकार दिला, भडकलेल्या पतीचा थेट चाकूने हल्ला, पुण्यातील घटना

    पिंपरी : कंबरदुखीमुळे जवळ येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून; तसेच चाकूने कमरेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाकड येथे घडली. पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलीवरही चाकूने वार झाल्याने ती जखमी झाली. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती (वय ३५, रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी पत्नीवर उपचार करण्यात येत आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरातील स्वयंपाकघरात दूध गरम करत होत्या. यावेळी कंबरदुखीच्या औषधांच्या गोळ्या घेत असताना पती मागून आला. त्याने फिर्यादीला सोबत येण्यास सांगितले. मात्र, मुले जागी असून, कंबर दुखत असल्याने उद्या पाहू, असे सांगून फिर्यादीने नकार दिला. याचा राग आल्याने; तसेच आरोपीकडून तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतला जात असल्याने त्याने ‘तुझे हे नेहमीचेच आहे, थांब आता तुला खल्लासच करतो,’ असे म्हणत दोन्ही हातांनी तिचा गळा दाबून श्वास कोंडला. त्यानंतर चाकूने तिच्या कमरेवर वार करून गंभीर जखमी केले.

    पत्नीला न पाठवल्याने सासऱ्यावर वार

    एकीकडे पिंपरीमध्ये पत्नीवर हल्ल्याची घटना घडली असताना पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीला माहेराहून नांदविण्यास पाठवत नसल्याच्या कारणावरून जावयाने सासऱ्याशी वाद घालून त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मॉडेल कॉलनी परिसरात घडली. या हल्ल्यात सासरे गंभीर जखमी झाले असून, जावयाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय भिमाजी विटकर (वय ७०, रा. मारुती मंदिराजवळ, वडारवाडी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा शशिकांत (वय ४०) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मधुकर हडकमोल (वय ४५, आमोदा, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    विटकर यांची मुलगी कौटुंबिक वादामुळे चार महिन्यांपूर्वी माहेरी आली होती. तिला पुन्हा नांदायला पाठवावे, यासाठी मधुकरने विटकर यांच्याकडे तगादा लावला होता. विटकर मॉडेल कॉलनीतील एका सोसायटीत रखवालदार म्हणून काम करतात. मधुकर हडकमोल बुधवारी (१२ ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास विटकर यांच्या कामाच्या ठिकाणी गेला. सोसायटीच्या आवारात त्याने सासऱ्याशी वाद घातला. त्यानंतर तीक्ष्ण शस्त्राने विटकर यांच्यावर वार केले.

    दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले विटकर यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार तपास करीत आहेत.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed