Tukaram Mundhe : परवाना मिळवून देण्याच्यासाठी कुणी पैसे मागतंय का? तुकाराम मुंढे यांचा नागरिकांना मोलाचा मेसेज
अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना मिळवून देण्यासाठी काही जणांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचं एफडीएच्या निदर्शनास आलं आहे. अशा लोकांना पैसे न देता ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन एफडीएने केलं आहे. तसेच अशाप्रकारे पैशांची मागणी करणाऱ्यांची एफडीएला ई-मेलद्वारे तक्रार करण्याचं आवाहनदेखील एफडीएकडून करण्यात आलं आहे.