• Wed. Mar 11th, 2026
    Sanjay Raut : ‘ज्या दिवशी अमित शहा राहणार नाहीत, तेव्हा…’; संजय राऊत यांचे मोठे विधान

    Sanjay Raut on Amit Shah : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू आहे. ठाकरे गटाला आगामी निवडणुकीआधी गळती लागली आहे. माजी आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात पकडला आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता ठाकरे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी ऑपरेशन टायगरबाबत बोलताना थेट गृहमंत्री अमित शहांचं नाव घेत मोठे विधान केले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : एकनाथ शिंदे यांचा कोणताच बालेकिल्ला नाही, त्यांनी पैशांच्या जोरावर काही बालेकिल्ले उभे केलेत. शिंदेंनी ५० वर्षात कोणतं महान कार्य केलं आहे की बालेकिल्ले उभे केले. ते काय लोकमान्य टिळक आहेत? त्यांची विचारधारा काय आहे? ते काय वल्लभभाई पटेल आहेत? दीनदयाळ उपाध्याय आहेत? अटलबिहारी वाजपेयी आहेत? ज्या दिवशी अमित शाह राहणार नाहीत त्या दिवशी यांची टेकडीसुद्धा राहणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    शरद पवारांसोबत कसला रूसवा-फुगवा, एका विषयामध्ये आम्ही शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या. ज्या महादजी शिंदे यांच्या नावाने ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कोणतं महान कार्य केलं? इतका शूर योद्धा महादजी शिंदेंच्या नावाने पुरस्कार मिळावा? महाराष्ट्र सदनमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरलखाली हा कार्यक्रम घेतला गेला. लोकांचा गैरसमज झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिला. शरद पवारांची फसवणूक झाली, हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता, तो खासगी कार्यक्रम होता. आमच्याकडे अशा अनेक खासगी संस्था असे पुरस्कार देत असतात. पण साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली साहित्य परिषदेची परवानगी न घेता हा पुरस्कार दिला गेला हा आमचा आक्षेप असल्याचं संजय राऊत म्हणाले.

    ही लोकशाही आहे, दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आमचं एखाद्या व्यक्तीविषयीच मत हे टोकाचं आहे. शरद पवारांचा पक्ष फोडण्याविषयीसुद्धा आमचं हेच मत आहे. शिवसेना आणि शरद पवाारांचा पक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी फोडला, त्यांनी या लोकांना हाताशी धरलं, आमच्या भावना टोकाच्या आहेत. भांडण असण्याचा प्रश्न नाही, आम्ही आमचं मत मांडल्याचं राऊतांनी सांगितलं .

    दरम्यान, आज दिल्लीमध्ये संध्याकाळी संजय राऊत आणि शरद पवार हे एकाच मंचावर असणार आहेत. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला दोघे येणार आहेत. एकनाथ शिंदे यांना पवारांच्या हस्ते पुरस्कार दिल्यापासून राऊतांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed