• Sat. Sep 19th, 2026

औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य – पालकमंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 18, 2026

हिंगोली, ‍दि. १७ (जिमाका): हिंगोलीच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या सकारात्मक उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

हिंगोली एमआयडीसी येथे प्लास्टिक पॅरालिसिस ऑईल फॅक्टरीचे लोकार्पण पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते (ता.१६) रोजी झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सतीश टापरे आदी उपस्थित होते.

प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने अशा प्रकल्पांना महत्त्व आहे. स्थानिक पातळीवर उद्योगांना चालना मिळाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच औद्योगिक विकासाला गती मिळण्यास मदत होईल, असे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी उद्योजक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. प्रकल्पाची कार्यपद्धती आणि कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed