Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: शिवजयंतीनिमित्त आज शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी येथे शरद पवारांचे आमदार बापू पठारेही दिसून आले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
शरद पवारांचे पुण्यातील एकमेव आमदार बापू पठारे आज शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळ्यात दिसून आले. इतकंच नाही तर ते शासकीय कार्यक्रमात मंचावरही दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बापू पठारे यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली. बापू पठारे हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आज ते उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत एका व्यासपीठावर दिसून आल्याने ते खरंच शरद पवारांची साथ सोडणार असल्याची शक्यता बळावली आहे.
शिवनेरी किल्ल्यावर आज शासकीय शिव जयंतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री, तसचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार हे ज्ञात असूनही बापू पठारे हे कार्यक्रमात आले होते. यावेळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटाना दिसून आले. तसेच, ते मंचावरही उपस्थित होते. मंचावर ते अजित पवार यांच्या मागे बसलेले दिसून आले. मतदारसंघातील कामा निमित्त भेट घेतल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

